Crime

अवैध गांजा विक्री करणाऱ्यांना अटक

Share

दुचाकीवरून अवैध गांजा विक्री करणाऱ्या गांजा तस्करावर उत्पादन शुल्क पोलिसांनी छापा टाकून अटक केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हडलसांग गावात घडली.

दुचाकीवरून अवैधरित्या गांजाची वाहतूक करताना कांतू नाईक व मारुती पवार यांना अटक करण्यात आली असून साडेतीन किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी इंडी झोन उत्पादन शुल्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: