Belagavi

विरोधकांना मते मागण्याचा अधिकार नाही-खा. धनंजय महाडिक,

Share

कुन्नूर येथे प्रचारसभा, असंख्य कार्यकर्ते, नागरिकांची उपस्थिती

निपाणी मतदारसंघात सर्व छोट्या मोठ्या गावात अनेक कोटींची विकासकामे मंत्री शशिकला जोल्ले यांनी राबवली आहेत. अगदी कुन्नूर सारख्या गावात 36 कोटीची विकास कामे झालेली असल्याचे पहावयास मिळत आहे. निपाणी मतदारसंघात एवढा विकास झालेला नव्हता परंतु गेल्या दहा वर्षात निपाणी मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभारला असून विरोधकांना जनतेकडे मते मागण्याचा अधिकार नाही. तसेच शशिकला जोल्ले यांना विजयाची हॅट्रिक कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन खा.धनंजय महाडिक यांनी केले.

मंत्री शशिकला जोल्ले यांचा प्रचार करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक कुन्नूर येथे आले होते ते पुढे म्हणाले विरोधक म्हणतात आम्हाला सत्ता द्या आम्ही विकास करू आणि शशिकला जोल्ले विकास करून जनतेसमोर येत आहेत यातला फरक जनतेने ओळखून मंत्री जोल्ले यांना मतदान करावे असे ते म्हणाले.

गेल्या अनेक वर्षे मतदानाच्या वेळेस एकच नारा असायचा सडक, बिजली, पाणी सत्तर वर्षे त्यांना मुद्दाच नव्हता पण गेल्या दहा वर्षात केंद्रात भाजपचे सरकार तसेच कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार आल्याने सडक, बिजली, पाणी हा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित नाही आहे. आज कुठलाही रस्ता अगदी शेतीकडे जाणाराही रस्ता डांबरीकरण झालेला आहे ग्रामीण भागात 24 तास वीज उपलब्ध आहे तसेच कर्नाटक मध्ये शेतीसाठी वीज मोफत आहे प्रत्येक गावात जल जीवन मिशन योजनेचे काम होत असल्याचे दिसत आहे. तसेच
निपाणी मतदारसंघात मंत्री जोल्ले यांनी विकास साधत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा कबड्डी, खो-खो, पतंग महोत्सव, क्रिकेट यासारख्या अनेक स्पर्धा भरवल्या. जाणता राजा, छत्रपती संभाजी महाराज, कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या जीवनावरील भव्य नाटक निपाणी मतदारसंघात सादर केले,आमदार म्हणून जे जे अपेक्षित असते ते शंभर टक्के मंत्री जोल्ले आपल्या मतदार संघातील नागरिकांना देतात म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री जोल्ले हे विजयी होणार असून जास्त मताधिक्काने जोल्ले यांना निवडून द्यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी कुन्नूर येथे प्रचार सभेमध्ये केले.

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या निपाणी मतदारसंघात दहा वर्षात दोन हजार कोटी पेक्षा अधिक निधीतून विकासकामे राबवली आहेत. अनेक मंदिराचा जीर्णोद्धार, शाळा कॉलेज, वस्तीग्रह, विधवा व अपंगांना घरे, पूरग्रस्त निधी, रस्ते, जल जीवन मिशन अंतर्गत योजना अशा अनेक प्रकारे योजना राबवल्या आहेत. तसेच महिलांना सन्मान जोल्ले ग्रुप कडून अनेक रोजगार, विविध उपक्रम तसेच कोरोना काळामध्ये मदत राबवले असून येणाऱ्या काळातील अशाच प्रकारचा विकास साधण्यासाठी येणाऱ्या दहा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हाला मतदान करून आपल्याला अधिक मताधिक्याने विजयी करावे असे सांगितले.

यावेळी भैरवनाथ पाटील यांनी स्वागत केले तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार सरोज जमदाडे यांनी मांनले.

या कार्यक्रमास निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, रामगोंडा पाटील, समीत सासणे, पवन पाटील, ऋषभ जैन, नितेश खोत,
श्रीकांत कणंगले, विजयराव जाधव, रामचंद्र कोळी, दत्तात्रय शिंदे, सागर पोवार, धनाजी हुजरे, सुनिता कणंगले, सुधाकर चौगुले यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होते.

फोटो.-कुन्नूर येथे प्रचार सभेवेळी बोलत असता खा. धनंजय महाडिक तसेच शेजारी शशिकला जोल्ले व इतर मान्यवर.

Tags: