आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार राजकुमार टोपण्णवार आणि त्यांची पत्नी कीर्ती टोपण्णावर ह्यानी , बेळगावच्या मुख्य बाजारपेठेत निवडणूक प्रचार जोमाने करून , मतदारांशी थेट संपर्क साधून ,मतयाचना केली .
व्हॉईस ओव्हर : बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या व्याप्तीतील ,चन्नमा सर्कल , काकतीवेस , शनिवार खूट , गणपत गल्ली , कंबळी खूट या बाजार पेठेतील भागात घरोघरी जाऊन प्रचार केला.
यावेळी बोलताना , राजकुमार टोपण्णावर म्हणाले कि बाजारपेठेसाठी अनुदान जाहीर झाले नाही.भाजपने शहरात विकासाच्या बाबतीत राजकारण केले आहे . स्मार्ट सिटी योजनेचा निधीचा योग्य विनियोग केलेला नाही .गेल्या 20 वर्षापासून या भागात बदल झालेला नाही. सामान्य लोकांना जागा देणे,नोकऱ्या देऊन तरुणांना सक्षम करणे.मोफत कोचिंग सेंटरअधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल, रस्ते गटार व स्वच्छता यावर अधिक भरदेऊ असे सांगून त्यांनी शहराच्या विकासासाठी आम आदमी पक्षाला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले
बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार राजू टोपण्णवार याना शहरात महिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.लोक भाजप आणि काँग्रेसला कंटाळले आहेत. शिक्षण आणि आरोग्यासह महिलांच्या स्वावलंबनासाठी आम आदमी पक्षाला साथ द्यावी, असे कीर्ती टोपण्णावर यांनी सांगितले
महिलांना बस पास देण्याबरोबरच गॅस तसेच नियमित वापराच्या वस्तूंचे नियमन व्हायला हवे, दिल्लीत नाही, तर येथे प्रकल्प राबविण्याची गरज आहे. भाजप आणि काँग्रेसने गरिबांच्या सर्व मूलभूत सुविधा हिसकावून घेतल्या आहेत. ‘अच्छे दिन’ म्हणत सरकारने जनतेची फसवणूक केली आहे . आम आदमी पक्षाचे भ्रष्टाचारविरहित सरकार स्थापन करण्यासाठी राजकुमार टोपण्णावर याना निवडून देण्याचे आवाहन सुजाता पाटील यांनी केले

शंकर हेगडे, सुजाता पाटील, जुनेद खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments