काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात अनेक ठिकाणी जोरदार प्रचार केला.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे. अशोकनगरमध्ये त्यांनी सकाळी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी चांभार गल्ली, बसवणकोळ्ळ येथे प्रचार केला. त्यानंतर त्यांनी बेळगावातील बागवान जमातमध्ये मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना राजू सेठ म्हणाले की, जनता आधीच भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे.
यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करेल यात शंका नाही. मुस्लीम बांधवांनी यावेळी काँग्रेसला समर्थन द्यावे, त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. सर्व मुस्लिम समाज बांधव या काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांना समर्थन देतील, विजयाचे सुकाणू हाती घेण्यासाठी मुस्लिम समाज सर्वतोपरी सहकार्य करेल असे वचन अनेकांनी दिले.
दावलसाब मुडलगी, करीमसाब बागवान, बशीर डोनी यांच्यासह मुस्लिम नेते, अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.


Recent Comments