Belagavi

कलखांब चेकपोस्टवर सोन्या-चांदीचे दागिने; एक लाख रुपये जप्त

Share

बेळगाव तालुक्यातील कलखांब चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख एक लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. एका कारमधून सोन्या-चांदीचे दागिने तर एका मोटारसायकलवरून नेण्यात येणारी रोकड जप्त करण्यात आली.

बेळगावहून निघालेल्या केए 22 पी 9467 क्रमांकाच्या ह्युंदाई कारची तपासणी केली असता, त्यात कोणतीही कागदपत्रे नसताना सोन्या-चांदीचे दागिने नेण्यात येत असल्याचे आढळून आले. ते पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त करण्यात आले. यावेळी 118 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर 1391 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले. जप्त करून ते आयकर अधिकारी श्रीमती लक्ष्मी कुलकर्णी यांच्या ताब्यात देण्यात आले.

 

या प्रकरणी वज्राय मनोहर वेर्णेकर यांच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीएफ आणि सीआरपीएफ पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत सीएपीएफ आणि एसएसटी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईत कलखांब चेकपोस्टवर मोटारसायकलवरून नेण्यात येत असलेली एक लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. या प्रकरणी चंदगड येथील रहिवासी सोमनाथ बसवराज होरकेरी याच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रक्कम आणि प्रकरण निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Tags: