Accident

कंटेनर दुचाकी अपघातात महिला जागीच ठार

Share

जत्रेला जाऊन परतताना , एपीएमसी रोडवरील, संगमेश्वर नगर येथील ड्यामरो शोरुम जवळ टू व्हीलर कंटेनर अपघातात 1 महिला जागीच ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडली आहे

अपघातग्रस्त दोघेही रामदेव गल्ली , बेळगाव येथील रहिवासी आहेत . सदर अपघातात छाया नागाप्पा भिसे (वय ६० ) ही महिला कंटेनरखाली सापडल्याने जागीच ठार झाली तर , नागाप्पा भिसे (वय ६८ ) हे जखमी झाले आहेत .

हे दोघे पतिपत्नी जत्रेला जाऊन परतत असताना हा अपघात घडला .

घटनास्थळी एपीएमसी पोलिसांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला

Tags: