Belagavi

सतीश जारकीहोळी यांची यमकनमर्डीत मतयाचना

Share

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील यमकनमर्डी गावाला भेट देऊन कुंभार समाज आणि देवांग समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या सलग बैठका घेऊन त्यांना 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली.

विकासाचे उद्दिष्ट ठेवून यमकनमर्डी मतदारसंघातील जनतेच्या सेवेत आपण गेली 15 वर्षे कार्यरत आहे, यावेळीही मतदार अभूतपूर्व पाठिंबा देतील, असे जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास यावरून वाटते असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी काँग्रेस नेते किरण राजपूत, ग्रामपंचायत सदस्य देवप्पा वानुरी, महांतेश कुंभार, चिन्नू कापसी, विलास कापसी, बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस एसटी कमिटीचे अध्यक्ष बाळेश दासनट्टी, बेळगाव जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष निंगाप्पा कुंभार, चिक्कोडी विभाग जिल्हा काँग्रेस एसटी विभाग सचिव शेट्टप्पा जूंट, ग्रापं सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक, काँग्रेस पक्षाचे नेते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: