निपाणी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत निपाणी शहरात भव्य रॅली काढण्यात आली.

या रॅलीत हजारो भाजप कार्यकर्त व मतदार सहभागी झाले होते. मंत्री शशिकला जोल्ले, राज पठाण, हालशुगरचे संचालक अमित रणदिवे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी सभापती राजु गुंदेशा, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, दिलीप चव्हाण, दिपक माने, शेरगुलखान पठाण आदीच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.

निपाणी शहरातील मिस्त्री गल्ली, चव्हाणवाडी, खराडे गल्ली, दर्गा गल्ली, नागोबा गल्ली, भाट गल्ली, भिसे गल्ली, कामगार चौक, बेल्लद बोळ, घिसाड गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पावले गल्ली या परिसरातून ही रॅली काढण्यात आली. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विजयाच्या आणि भाजपाच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि रॅलीतील गर्दीमुळे परिसर भाजपमय झाला होता. या रॅलीत रमेश वैद्य, सुभाष कदम, विकास वासुदेव, जमीर पठाण, संदीप वाडकर, मारूती भिसे, संजय चिकोर्डे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांची उपस्थितीही प्रचंड होती.


Recent Comments