Belagavi

बेळगावात षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम

Share

बसव जयंतीनिमित्त बेळगावात जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने आज षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

बेळगावातील शिवबसव नगरातील आर. एन. शेट्टी पॉलीटेक्नीकच्या आवारात आज षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. श्री. अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात कडोलीच्या दुरदुन्डेश्वर मठाचे श्री. गुरु बसवलिंग स्वामीजी यांनी षडस्थल ध्वजारोहण केले.

यावेळी महिलांनी षडस्थल ध्वजगीत सादर केले.

यावेळी बोलताना दुरदुन्डेश्वर मठाचे श्री. गुरु बसवलिंग स्वामीजी म्हणाले की, षडस्थल ध्वज हा लिंगायत धर्मध्वज आहे. कोणत्याही व्यक्तीपेक्षा तो मोठा आहे. माणसाला आत्मशुद्धी करणे महत्वाचे आहे. धर्माने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे आचरण केल्यास आत्मशुद्धी होते. षडस्थल ध्वज त्यासाठी प्रेरणा देतो असे त्यांनी सांगितले.


जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी अल्लमप्रभू स्वामीजी, गुरु बसवलिंग स्वामीजी यांची पाद्यपूजा करून त्यांचा सन्मान केला. रत्ना झोन्ड, महादेवी हिरेमठ व गीता यांनी वचनप्रार्थना सादर केली. सी. जी. मठपती यांनी आभार मानले.

Tags: