Belagavi

न्यायदान क्षेत्रातील प्रत्येकाने प्रगत तंत्रज्ञानाचा करावा अवलंब : प्रा. अक्षय यादव

Share

प्रगत तंत्रज्ञानामुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच न्यायदान क्षेत्रालाही मोठे फायदे होत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा वकिलांसह न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी लाभ घेतला पाहिजे असे आवाहन बेंगळूरच्या एनएलएसआययूचे प्रा. अक्षय यादव यांनी केले.

बेळगाव वकील संघटना आणि भारतपर्व फौंडेशनतर्फे वकील संघटनेच्या समुदाय भवनात “तंत्रज्ञान आणि कायदा” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी व्याख्यान देताना प्रा. अक्षय यादव पुढे म्हणाले की, देशाची प्रगती, धोरण निश्चिती यात शिक्षणाचे मोठे योगदान लाभत आहे. शिक्षणातून तंत्रज्ञानाच्या नवनव्या आविष्कारांमुळे अनेक क्षेत्रांचा फायदा होत आहे. तसाच तो न्यायव्यवस्थेलाही होत आहे. अशील, वकील आणि न्यायालय या सगळ्यांनाच नवे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.

कोविड काळात देशात इंटरनेटचा वापर न भूतो वाढला. 2020 मध्ये देशातील 840 दशलक्ष लोक इंटरनेट वापरत होते. ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खटल्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, लाईव्ह स्ट्रीमिंग आदी माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने तंत्रज्ञानाचा लाभ न्यायदान क्षेत्राला होत आहे.

प्रलंबित खटल्यांची सुनावणी त्वरित घेणे, त्यातून खटले लवकर निकाली काढणे सोपे होत आहे. त्यामुळे पक्षकार नागरिकांनाही आपसूक फायदा होत आहे. न्यायदान प्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येकानं नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक बनले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी वकील संघटनेचे सभासद उपस्थित होते.

Tags: