Belagavi

आसिफ सेठ यांचा अशोकनगर भागात झंझावाती प्रचार

Share

 

काँग्रेस पक्षाची सत्ता येताच , महिलांसाठी मोफत केएसआरटीसी प्रवास योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या अशोकनगर येथील प्रचारादरम्यान दिली .

बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्यांना जनेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . आज त्यांनी अशोकनगर भागात जाऊन घरोघरी भेट देऊन मतयाचना केली . यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेसच्या गॅरंटीकार्डची माहिती देऊन ,

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोणत्या योजना प्राधान्याने राबवणार आहे त्याची माहिती दिली . यानंतर आपली मराठीला माहिती देताना त्यांनी सांगितले कि , सर्व जातीधर्माच्या , सर्व भाषिक मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे . राज्यातील जनता भाजप राजवटीला कंटाळली आहे . भाजप सरकारने केलेल्या सर्व प्रकारच्या दरवाढीमुळे जनता कंटाळून गेली आहे . जनतेला बदल हवा आहे आमचे हमीपत्र हे केवळ आश्वासन नसून सत्तेत आल्यानंतर सर्व गोष्टींची आम्ही प्राधान्याने पूर्तता करू असे ते म्हणाले .

अशोक नगर भागातील रहिवासी असलेल्या ऍड . पूजा यांनी , इथल्या रहिवाशांच्या वतीने आसिफ सेठ याना पूर्ण पाठिंबा दर्शवला . आसिफ सेठ यांनी आमच्या भागातील समस्या जाणून घेऊन , त्या सोडवण्याची हमी आम्हाला दिली आहे . आम्हा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे असे त्या म्हणाल्या .

यावेळी आसिफ सेठ यांनी जनतेशी संवाद साधला. याचवेळी अशोक नगर भागातील अनेकांनी काँगेस पक्षात प्रवेश केला .
यावेळी आसिफ सेठ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: