Belagavi

दक्षिणेत अभय पाटील यांचा झंझावाती प्रचार; आरती ओवाळून केले मतदारांनी स्वागत

Share

बेळगाव दक्षिण भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अभय पाटील यांनी आज टिळकवाडी, अनगोळ परिसरात आपल्या शेकडो समर्थकांसह भव्य रोड शोद्वारे प्रचार केला.

टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयासमोरून खुल्या वाहनातून अभय पाटील रोड शोसाठी निघाले असता, मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नगरसेविका वाणी जोशी, अभिजित जवळकर आदींनी आमदार अभय पाटील यांना साथ दिली.


चिदंबर नगर, मृत्युंजय नगर आणि भाग्यनगर आणि प्रभाग क्रमांक 43 मधील इतर भागात हा रोड शो करण्यात आला. मिरवणुकीच्या मध्यभागी आ. अभय पाटील यांच्यावर मतदारांनी पुष्पवृष्टी केली. महिलांनी आरती करून त्यांना आशीर्वाद दिला.

भाग्यनगरमध्ये मधु गुरव यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अभय पाटील यांचे स्वागत करून त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, चिदंबरनगरातील शनी मंदिरात अभय पाटील यांनी प्रार्थना करून लाखो मतांनी विजयी व्हावे यासाठी शनिदेवाला अभिषेक करून विशेष पूजाही केली.

तेथील महिलांनी अभय पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अनगोळ मेन रोडवरील आर्यनिवास चाळ येथील रहिवाशांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले.

Tags: