Belagavi

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रौडीशिटर्सना बेळगाव पोलिसांचा दणका

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी कुख्यात रौडीशिटर्सना चांगलाच दणका दिलाय. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 70 रौडीशिटर्सच्या घरावर छापे टाकून बेळगाव पोलिसांनी झडती घेत दोन धारदार हत्यारे जप्त केली आहेत.

शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देऊन सांगितले की, विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घेत आहेत. ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाया, छापेमारी, हत्यारे बाळगण्यास प्रतिबंध आदी उपाय योजण्यात येत आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 12 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 70 रौडीशिटर्सच्या घरांवर छापेमारी करून दडवून ठेवलेल्या हत्यारांचा शोध घेण्यात आला. बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एच. टी. शेखर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान दोन लांब धारदार शस्त्रे आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत आहोत.

डीसीपी शेखर यांच्यासह मार्केट, क्राईम, खडेबाजारचे एसीपी, पीआय यांनी या कारवाईत भाग घेतला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दंगलीच्या गुन्ह्यात गुंतलेल्या आणि शस्त्रे ठेवणाऱ्यांची आम्ही तपासणी केली आहे असे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी सांगितले. बाईट
एकंदर, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव पोलिसांनी कंबर कसली असल्याचे यावरून दिसून येते.

 

Tags: