Crime

लाचखाऊ भूमापन अधिकाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी, दहा हजार दंड

Share

लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकलेल्या लाचखाऊ भूमापन अधिकाऱ्याला धारवाड तिसर्‍या उच्च व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या वर्षी 2018 मध्ये, रमेश डवळगी नावाचा भूमापन अधिकारी हुबळी येथील मिनी विधानसौधमध्ये जमिनीच्या सर्वेक्षणासाठी एका शेतकऱ्याकडून 4000 लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात रंगेहात सापडला होता. या पार्श्‍वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याच्या सुनावणीत आरोपी दोषी आढळला असून न्यायालयाने आरोपीला 3 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Tags: