Belagavi

काकर गल्ली मोहल्ला परिसरात माजी आमदार फिरोज सेठ यांच्याकडून प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदार संघातील काँगेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रचारासाठी त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांनी आज प्रचारमोहीम राबवली.

बेळगावातील काकर गल्ली मोहल्ला परिसरात माजी आमदार फिरोज सेठ यांनी काँग्रेस उमेदवार राजू सेठ यांच्यासाठी घरोघरी प्रचारमोहीम राबवली. प्रारंभी काकर गल्ली मोहल्ला जमातसोबत त्यांनी बैठक घेतली यावेळी बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. गेल्या पाच वर्षांत बेळगाव शहराचा जो विकास झाला नाही, तो काँग्रेस सत्तेत येताच करून देऊ अशी ग्वाही फिरोज सेठ यांनी दिली. त्यानंतर घरोघरी संपर्क साधून राज्यातील ४०% भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. १० मे रोजी न चुकता घराबाहेर पडून सर्वानी मतदान करण्यास सांगितले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फिरोज सेठ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बेळगाव उत्तर मतदार संघात प्रचार करत आहोत. प्रामुख्याने पाणी समस्येविषयी लोकांनी गाऱ्हाणे मांडले आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर येताच पाणीसमस्येसह सर्व नागरी समस्यांची सोडवणूक करून लोकांना सुविधा पुरवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


यावेळी काकर गल्ली मोहल्ला जमात अध्यक्ष महंमद गौस शेख, रफिक बेपारी, आयुब बेपारी, आबिद शेख, मोनिका, आजी-माजी नगरसेवक, पिरजादे, आर. पी. पाटील, शकील मुल्ला यांच्यासह स्थानिक रहिवासी,काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: