खानापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणाऱ्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पारिशवाडमध्ये प्रचार मोहीम काढली.

पारिशवाडमध्ये प्रचार करताना आ. निंबाळकर यांनी मुस्लिम समुदायाच्या मतदारांशी घरोघरी संपर्क साधून निवडून देण्याचे आवाहन केले.

छोटी प्रचारसभा घेऊन त्यांनी आमदारपदाच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती देऊन पुढेही विकास करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्याचे आवाहन केले. मतदारांनीही त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.



Recent Comments