विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदारसंघात भाजप पक्षाने पुन्हा गुंडगिरी सुरू केल्याचा आरोप काँग्रेस महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा विद्याराणी तुंगल यांनी केला.
बुधवारी विजापूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी बबलेश्वर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विजुगौडा पाटील यांच्यावर गुंडगिरीचा थेट आरोप केला. तसेच बबलेश्वर मध्ये काँग्रेस महिला नेत्या व कार्यकर्त्यांना संरक्षण नाही. काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार एम.बी.पाटील यांच्या मतदानात अडथळा आणत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपचे उमेदवार विजुगौडा पाटील यांनी आधी दारूची दुकाने बंद करावीत. तेव्हा त्यांनी प्रचाराला यावे, असे आव्हान दिले.
तसेच माजी गृहराज्यमंत्री एम बी पाटील यांच्या पत्नी आशा पाटील यांच्या प्रचारादरम्यान गैरप्रकार करून गोंधळ घालण्यात आला . यामागे भाजपचा हात आहे. पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी राज्याबाहेरून येऊन गोंधळ घातला आहे. त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार एम.बी.पाटील यांनी कार्यकर्त्याला दिला सल्ला. मात्र, सल्ला ऐकून न घेतल्याने त्यांनी त्याला दोनदा चापट मारली. हा हल्ला नाही. विरोधी पक्षाने तो ट्विस्ट करून व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी दीपा कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments