डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या नावाने वॉर्ड क्रमांक तीनमधील पंचायतीच्या जागेत समुदाय भवन बांधून देण्याची मागणी एमके हुबळीतील दलित कुटुंबांनी केली आहे.
याबाबत आज नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, जवळपास 40 वर्षांपासून 50 ते 60 दलित कुटुंबे पंचायतीच्या जागेत राहत असून आमच्या समाजाला संमेलन समारंभाच्या सोयीसाठी भवनाची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून दलितांसाठी जगजीवनराम भवन बांधून द्यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
राजू चलवादी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कस्तुरव्वा तळवार, काशव्वा हिंडलगी, मल्लव्वा तळवार, गंगव्वा चलवादी, शेखव्वा उळीगेरी, महादेवी कुंदे, राजशेखर हिंडलगी, नागव्वा पागद, गौरव मादार, आणि इतर दलित कुटुंबे आदी दलित नेते उपस्थित होते.
Recent Comments