Belagavi

मुतगे येथे काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मुतगा गावातील गोकुळ नगर येथे बुधवारी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले.


कार्यकर्ते ही पक्षाची संपत्ती असून निवडणुकीच्या काळात अथक परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा जनतेलाही होऊ शकतो,

असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस सरकारचे यश, लोककल्याणकारी कामे आणि भाजप सरकारचे अपयश, महागाई, भ्रष्टाचार याची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.


यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, तालुका पंचायत माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई, पिंटू मल्लवगोळ, गजानन कणबरकर, श्याम मुतगेकर, दिलीप बसरीकट्टी, महेश सुगन्नावर, रुद्रप्पा मुतगेकर, प्रदीप कारागीर, मुतगेकर, प्रभाकर पाटील, फकिरव्वा अमरापुर, लक्ष्मी पाटील, मंजुळा अगसिमनी, शीला सैबन्नावर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: