अथणी शहरातील एसएमएस कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आलेले माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, लक्ष्मण सवदी यांच्या घराजवळ येताच कार्यकर्त्यांनी लक्ष्मण सवदी यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली.

यायला भाजप कार्यकर्ते व काँग्रेस कारकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते .
येडियुरप्पा हे तेथून जात असताना त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तर सवदी समर्थकांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेऊन त्यांचे नेते लक्ष्मण सवदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
येडियुरप्पांसारखे लोक अथणीत येऊन शंभरवेळा प्रचार करूनही सवदी याना हरवणे अशक्य असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितल्याची घटनाही घडली. तेथे असलेले निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


Recent Comments