बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा चेकपोस्टवर एका प्रवाशाकडून बसमधून नेण्यात येत असलेले 15 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी वाहनांची तपासणी करून अवैध मार्गाने नेण्यात येत असलेली रोकड, मद्य, सोने-चांदीचे दागिने आदी साहित्य जप्त करण्यात येत आहे. याचप्रकारे घटप्रभा येथील तपासणी नाक्यावर तैनात कर्मचाऱ्यांनी 15 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले. त्यांची किंमत 13 लाख रुपये आहे. अरभावीच्या प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
Recent Comments