election

भाजप-जेडीएस नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

गंदिगवाड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष उदय हिरेमठ व हिरेमुनवळ्ळी गावचे अकलाक सनदी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गंदिगवाड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व खानापूर तालुका पीकेपीएसचे सदस्य उदय हिरेमठ व जेडीएस तालुका कार्याध्यक्ष व हिरेमुनवल्ली ग्रामपंचायत सदस्य अकलाक सनदी यांनी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला.

यावेळी बोलताना या दोघांनी, गंदिगवाड ग्रामपंचायत क्षेत्रात आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कोटय़वधी रुपयांची विकासकामे केली असून त्यांना संपूर्ण पूर्व भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे असे सांगितले.

तसेच देवलत्ती गावचे भाजपचे नेते संतोष इटगी व कल्लाप्पा शिमण्णागौडर यांनीही आमदार निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Tags: