Belagavi

काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ याना जनतेचा भरघोस पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या मतदारसंघातील विविध भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन , चांगल्या भविष्याचे आश्वासन दिले .

आपल्या समाजकार्याची सतत जनतेच्या संपर्कात असलेले , अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष , तसेच सध्याचे काँग्रेसचे बेळगाव उत्तर मतदार संघाचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ हे प्रचारादरम्यान जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत . त्यांनी नेहरूनगर येथील पी के क्वार्टर्सला भेट दिली आणि स्थानिक समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली . यावेळी इथल्या रहिवाशांनी आसिफ सेठ याना पूर्ण पाठिंबा दर्शवला .

त्याचप्रमाणे ,मतदार संघातील श्रीनगर भागात देखील असिफ सेठ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन तिथल्या रहिवाशांना भेट दिली . यावेळी असिफ सेठ यांचे रहिवाशांनी उत्स्फूर्त स्वागत करून पाठिंबा दर्शवला . यावेळी इथल्या लोकांनी , आसिफ सेठ यांच्यासमोर , आपल्या भागातील समस्यांचा पाढा वाचला . त्याला प्रतिसाद देत , असिफ सेठ यांनी भविष्यात या सर्व समस्यांचे निराकरण करू असे सांगितले .

एकंदर , कोरोना काळात केले समाजमुखी कार्य , तसेच गोरगरिबांना केलेली मदत , शिक्षण क्षेत्रात
आपल्या संस्थेच्या माध्यमांतून , समाजातील मुलींना दिलेले प्राधान्य , त्याच प्रमाणे माजी आ . फिरोज सेठ यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात उत्तर मतदारसंघाचा केलेला विकास लक्षात घेता , काँग्रेस उमेदवार आसिफ सेठ याना , मतदारसंघातून भरघोस पाठिंबा मिळत आहे .

Tags: