वैध कागदपत्रांअभावी नेण्यात येत असलेली तब्बल 70 लाख रुपयांची रक्कम कागवाड-मिरज रोड चेक पोस्टवर जप्त करण्यात आली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात विशेषतः आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. याठिकाणी अवैध रक्कम, दारू, मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येत असलेल्या साहित्याच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवून कारवाई करण्यात येत आहे.
अशाच प्रकारे एसएलबीसी नियमांची पूर्तता न करता नेण्यात येत असलेली 70 लाख रुपयांची रोख रक्कम कागवाड चेकपोस्टवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
Recent Comments