सवदत्ती तालुक्यातील यडहल्ली आणि केंचरमनहाळ गावात भगवान बसवेश्वरांची जत्रा सुरू झाली असून आज भगवान बसवेश्वरांच्या मंदिरात विविध पूजाविधी पार पडल्या.

मंदिरांमध्ये बसवण्णांची पूजा करून , सजवलेल्या बैलांची मुख्य रस्त्यांवर आकर्षक मिरवणूक काढण्यात आली .

रथोत्सवाचे आकर्षण दुपारीहोणारा भव्य रथोत्सव डोळ्यांना पारणे फेडणारा होता . भाविकांनी रथांवर , फुले , खारीक , भंडारा उधळून गावातील आबालवृद्धांनी हार रथ ओढला .
यावेळीयडहल्ली येथील गावातील ज्येष्ठ, युवक, ग्रामपंचायत सदस्य महेश देसाई, महादेव बुदनूर, संजीव सोगल, गुरुनाथ लगमण्णावर, मुदुकप्पा बदली, बसवराज, मसनावर, बसवराज, तरलकट्टी, विठ्ठल वटवती, केंचाराम आदींनी सहभाग घेतला.


Recent Comments