Belagavi

राजकुमार टोपण्णावर यांचा प्राचारादरम्यान मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमीचे उमेदवार राजकुमार टोपण्णावर यांनी सोमवारी जिल्हा स्टेडियमवर युवकांशी निवडणूक चर्चा करून आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची विनंती केली.
जिल्हा क्रीडांगणावर युवकांशी चर्चा करताना राजकुमार यांनी टोपण्णावर यांनी येथील तरुणांच्या अडचणी ऐकून घेतल्या. आम आदमी पक्षाला संधी दिल्यास स्थानिक पातळीवर सुसज्ज स्टेडियम आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


बेळगावात , वीरभद्रनगरातही राजकुमार टोपण्णावर यांनी प्रचार केला . यापूर्वीच सत्ता मिळवलेल्या भाजपला दावा केल्याप्रमाणे विकास झालेला दिसत नाही. तुम्ही मला संधी दिल्यास मी तुमच्या घराचा म्हणून तुमच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करेन, असा प्रचार टोपण्णावर यांनी केला.


यावेळी शंकर हेगडे, शिवानंद कारी, रवींद्र बेल्लद , जुनैद खान यांच्यासह शेकडो आप कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: