election

भाजपचे पुन्हा वर्चस्व सिद्ध करा अण्णासाहेब जोल्ले- बोरगाव येथे भाजप प्रचार सभा.

Share

निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांना मतदान केल्याशिवाय पर्याय नाही. मागील दहा वर्षे मंत्री जोल्ले यांनी धडाकेबाज कामगिरी केली असून पुन्हा बोरगाव सह निपाणी त भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्याचे आवाहन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. रविवारी (ता. २३) बोरगाव (ता. निपाणी) येथे भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचाराचा प्रारंभ करून खासदार जोल्ले बोलत होते.

 

प्रथम ग्रामदैवत बाबा ढंगवली दर्गा येथे उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यानंतर खासदार जोल्ले म्हणाले, बोरगाव मध्ये मंत्री जोल्ले यांच्या प्रयत्नामुळे 102 कोटी वर निधीतून विकास कमी झाली आहेत. मतदार संघात दोन हजार कोटी वर निधी आणला आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून मंत्री जोल्ले यांनी निपाणीसाठी राज्यात आदर्शवत योगदान दिले आहे.

भविष्यातही निपाणी मतदार संघासाठी आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. मंत्री जोल्ले यांना मतदान म्हणजे विकासाला मतदान केल्यासारखे आहे. हाल शुगर संचालक जयकुमार खोत यांनी विकासासाठी असणारी मंत्री जोल्ले यांची तळमळ पाहून पुन्हा एक वेळ त्यांना विधानसभेवर पाठवून हॅट्रिक करावी. सुनील पाटील, शरद जंगटे, फिरोज अफाराज, शिवाजी भोरे, वक्फ बोर्ड जिल्हा अध्यक्ष अन्वर दाडीवाले, शब्बीर गवंडी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील, अप्पासाहेब जोल्ले, रमेश पाटील, बाबासो चौगुले, फिरोज अपराज, देव माळी, जमील अत्तार, प्रकाश मालगावे, महावीर पाटील,अजित कडोले, भरमा कुडचे, प्रशांत तळवार,आण्णासो डकरे, महिपती खोत, शिशु ऐदमाळे, शांतू पत्रावळे ,अजित तेरदाळे, विष्णू तोडकर, संजू महाजन, पिंटू बेवनकट्टी, शितल हवले, राजू कुंभार, आयुब मकानदार, आप्पा मुजावर, अल्लू मुजावर, रवी भोरे, राजु लटलटे, भरत जंगटे, कल्लू ऐदमाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
बाबासाहेब चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू तोडकर यांनी आभार मानले.

Tags: