निपाणी तालुक्यातील भोज, भोजवाडी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. मंत्री शशिकला जोल्ले यांनी भाजपची शाल घालून त्यांचे स्वागत केले.

श्रीकृष्ण हणबर गवळी समाजाचे राजू मगदुम, उत्तमकुमार बाडदहट्टी, वैशाली नाईक, दादासाब बाडदहट्टी, अंदुबाई हणबर, अशोक मगदुम, संतोष बाडदहट्टी, शोभा हणबर, रवींद्र बाडदहट्टी, नागराज खोत, भीमराव खोत, सचिन मस्ती, राजू यल्लन्नवर, राजू यल्लन्नवर, राजू यल्लन्नवर, अजित हणबर, राजू पाटील, उत्तम मोगले, चंद्रकांत बुडाळे, राजू इटनाळे, मारुती बिदरोळे, कुमार हणबर, भरत हणबर, सत्यव्वा कुरळे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी राजू मगदुम म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आपण एका पक्षापुरते मर्यादित असून आजपर्यंत समाजाच्या विकासाच्या मागण्या करत आलो आहोत. मात्र काँग्रेस पक्षाकडून प्रगतीची कोणतीही चिन्हे नसताना आम्ही झगडत आहोत. भाजप पक्ष आणि जोल्ले दाम्पत्याने केलेला तालुक्याचा आणि इतर समाजाचा विकास आपण पाहत आहोत. समाजाच्या विकासासाठी भाजप पक्ष आणि जोल्ले दाम्पत्यासोबत राहायचे, असे ठरवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले.


Recent Comments