election

गोकाकमध्ये मौनक्रांती, धर्मक्रांती सुरु आहे, तेथे धर्म जिंकेल : लक्ष्मण सवदी यांचा पलटवार

Share

गोकाकमध्ये मौनक्रांती, धर्मक्रांती सुरु आहे, तेथे धर्म जिंकेल असे सांगत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पलटवार केला.
गोकाक येथे काँग्रेस उमेदवार डॉ. महांतेश कडाडी यांच्या प्रचारासाठी आले असता, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण सवदी यांनी राज्याच्या राजकारणात ते केंद्रबिंदू असल्याचा इन्कार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सिद्दरामय्या, डीकेशी हे केंद्रबिंदू आहेत. मी तर अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, साधा कार्यकर्ता म्हणून प्रचार करतोय. राज्यात काँग्रेसची लाट आहे. काँग्रेस सत्तेत येईल आणि जनपर प्रशासन देईल, राज्यात एक नवा राजकीय अध्याय सुरु होईल असे ते म्हणाले.

रमेश जारकीहोळी यांनी अथणीत आपल्याविरोधात प्रचार करण्याचे आव्हान दिल्याच्या मुद्द्यावर, त्यांनी जरूर यावे, अथणीत माझे एक घर खाली आहे, तेथे नाश्ता-जेवणाची चांगली सोय आहे. ते घर त्यांना देऊ. गोकाकमध्ये मला घराची गरज नाही, मी काही बाहेरचा नाही, पक्ष कुठे पाठवेल तेथे प्रचाराला जातो असा पलटवार त्यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर केला. कोणी कितीही शपथा घेतल्या म्हणून काही बिघडत नाही. लोक निर्णय देतील. अथणीच्या जनतेला मी काय सांगायचे ते सांगितले आहे. तेथील जनतेने मला एक रक्षाकवच दिले आहे. ते घालून मी धर्मयुद्धात उतरलो आहे. अथणीत माझ्या बाजूने लाट आहे. बहुधा यावेळी मी जीवनात सर्वाधिक मताधिक्क्याने जिंकून येईन असा विश्वास व्यक्त करून गोकाकमध्ये मौनक्रांती, धर्मक्रांती सुरु आहे, तेथे धर्म जिंकेल असे सांगत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पलटवार केला. बाईट
एकंदर, लक्ष्मण सवदी आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात अथणी आणि गोकाक मतदार संघात राजकीय युद्ध चांगलेच रंगू लागले आहे. त्याने केवळ बेळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यात कोण बाजी मारणार हे निकालादिवशी, 13 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

Tags: