राहुल गांधी लिंगायत मठांना भेटी देऊ देत, विभूती लावून घेऊ देत, ते चांगलेच आहे. पण मतदार काय कौल देतात हे महत्वाचे आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राहुल गांधींनी लिंगायत स्वामीजींच्या भेटी घेण्याच्या मुद्द्यावर उपहासात्मक टीका केली.
प्रसारमाध्यमंही बोलताना, राहुल गांधी यांच्या लिंगायत स्वामीजींच्या भेटीसंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी, राहुल गांधी लिंगायत मठांना, स्वामीजींना भेटू देत, विभूती लावून घेऊ देत, ते चांगलेच आहे. पण मतदार काय कौल देतात हे महत्वाचे आहे. यावेळी मतदार खूप विचार करून निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. भाजपने केलेला विकास मतदारांना माहित आहे. ते विकासालाच मत देतील असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.
केपीसीसी कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या टेम्पलरनवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मंदिरात जाऊन पूजाअर्चा, धार्मिक विधिविधान करणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मतदार कोणाला आशीर्वाद देतील ते महत्वाचे. डीकेशी सांगतात एक अन करतात दुसरेच, हे मतदारांना ठाऊक आहे असे बोम्मई म्हणाले. मध्य कर्नाटकातून, हावेरी व अन्य जिल्ह्यात प्रचार करणार आहे. उद्या, परवा बेळगाव जिल्ह्यात प्रचार करणार आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments