Dharwad

तवनप्पा अष्टगी यांना योग्य स्थान-मान देऊ : सतीश जारकीहोळी

Share

तवनप्पा अष्टगी यांनी आज अधिकृतपणे भाजप सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या ताकदीनुसार त्यांना आमच्या पक्षात स्थान दिले जाईल, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
धारवाडमध्ये बोलताना ते म्हणाले, वरिष्ठांच्या सूचनेवरून मी तवनप्पा अष्टगी यांच्या घरी आलो होतो. यापुढे ते काँग्रेस पक्षाचे काम करणार आहेत. हा एक चांगली घडामोड आहे. त्यांनी अपक्ष सदस्य म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो उद्या परत घेऊन ते विनय कुलकर्णी यांच्या समर्थनार्थ उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता. आम्ही येऊन विनंती केल्याने आता त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ज्या मतदार संघातून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत, त्याव्यतिरिक्त त्याचा परिणाम इतरत्रही होणार आहे. तवनप्पा लहान समाजातून आले असले तरी ते काँग्रेसमध्ये येऊन मोठे नेते होतील असा विश्वास जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

एकंदर, निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज माघारी घेत तवनप्पा अष्टगी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, त्यांना योग्य स्थान-मान देऊ असे काँग्रेसने म्हटले आहे. ते कितपत खरे ठरते हे येणारा काळच सांगेल.

Tags: