भाजपने महादेवप्पा यादवाड याना तिकीट न देत चिक्करेवण्णा याना पक्षाची उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महादेवप्पा यादवाड यांची समजूत काढण्यासाठी आ . बसनगौडा पाटील यत्नाळ तसेच खा . इरण्णा कडाडी यांनी तातडीने यांच्या घरी भेट दिली .
व्हॉईस ओव्हर : पक्षाने तिकीट नाकारल्याने , महादेवप्पा यादवाड बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज भरला . मात्र यामुळे भाजपच्या मताची विभागणी होऊन, याचा परिणाम भाजप पक्षाचा उमेदवार निवडून न येता अन्य पक्षाच्या उमेदवाराचा फायदा होईल हे लक्षात घेऊन आ . बसनगौडा पाटील यत्नाळ तसेच खा . इरण्णा कडाडी यांनी तातडीने , बंडखोर उमेदवार महादेवाप्पा यादवाड यांच्या घरी भेट देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला . त्यांनी महादेवप्पा यादवाड यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला . भाजप पक्षात तुम्हाला योग्य स्थान दिले जाईल.

भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी तुम्ही मेहनत घ्या असेही सांगितले . त्याचप्रमाणे यादवाड यांना पक्षहितासाठी रिंगणातून माघार घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले .

पक्षाने ज्या प्रकारे वागणूक दिली त्यावर महादेवप्पा यादवाड नाराज आहेत यावेळी त्यांनी भाजपने चिक्करेवण्णा यांना तिकीट दिल्याने नाराजी व्यक्त केली
तब्बल दोन तास हे दोन्ही नेते यादवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते . यादवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास भाजपच्या मतांची विभागणी होण्याची खात्री आहे.
काँग्रेसचे उमेदवार अशोक पट्टण यांचा थेट फायदा होणार आहे
त्यामुळे ह्या जुन्या बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्याची शेवटच्या क्षणापर्यंतची कसरत सुरु होती .
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना , खा . इराण्णा कडाडी यांनी सांगितले कि , महादेवप्पा यादवाड अनेकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत . गेली २० वर्षे पक्ष संघटनेचे काम करीत आहेत . पक्षाच्या बाबतीत त्यांना कळकळ आहे . त्यांच्या बाबतीत जे काही झाले त्याबद्दल पक्ष त्यांना योग्य न्याय देईल . ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत ,ते निश्चितपणे भाजप पक्षातच राहतील असे सांगितले .
आता आ . यत्नाळ आणि खा . इराण्णा कडाडी यांनी तर महादेवप्पा यादवाड याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र यादवाड यावर कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल .


Recent Comments