भाजपचे बेळगाव उत्तरमधील उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी आज पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिराला भेट देऊन मुनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
भाजपचे बेळगाव उत्तरमधील उमेदवार डॉ. रवी पाटील हे प्रचाराचा एक भाग म्हणून मतदारसंघातील मंदिरे,
प्रार्थनास्थळांना भेटी देऊन संपर्क साधत आहेत. आज त्यांनी श्वेतांबर जैन समाजाचे श्रद्धास्थान पांगुळ गल्लीतील श्री चंद्रप्रभ श्वेतांबर जैन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आचार्य महेंद्र स्वामीजी यांना नमन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी संजय पोरवाल, उत्तम पोरवाल, बाबुलाल पोरवाल, जतीन पोरवाल, विजय भद्रा, शैलेश कैवल्य, विक्रम पुरोहित आदी उपस्थित होते.


Recent Comments