अडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात विरक्त मठाचे शिवबसव महास्वामी व क्यारगुड्ड येथील मंजुनाथ महाराज व नगराध्यक्ष ए.के.पाटील यांच्या हस्ते बसवण्णा प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बसव जयंती प्रभारी सुभाष नाईक यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगज्योती बसवेश्वर जयंती, सर्वधर्मीय नेत्यांच्या वतीने उपतहसीलदार एन.आर.पाटील व विविध समाजाचे नेते, बसव ज्योती यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. उळवी बसवेश्वर मंदिर येथून बसवण्णा ज्योत आणण्यात येत असून जयंती मोठ्या थाटात साजरी केली जात आहे.
स्वामीजींनी यावेळी बोलताना सांगितले कि , 12 व्या शतकात सर्व धर्मांच्या समानतेचा संदेश देणारे महान मानवतावादी श्री. बसवेश्वर यांनी कायक हा कैलास आहे असा संदेश दिला . या महान संतांची तत्त्वे आणि आदर्श आपण अंमलात आणले पाहिजेत.
त्यानंतर बैलांची मिरवणूक शहरातील बाजाररोड मार्गे जाऊन , नवीन बसस्थानकाकडे मार्गस्थ होऊन पुन्हा बसवेश्वर मंदिर येथे येऊन समाप्त झाली.
नंतर जनावरांच्या प्रदर्शनात सुदृढ गायींना बक्षीस देण्यात आले.
यावेळी बसव जयंती उत्सव समिती सदस्य विजय रवदी , परगौडा पाटील, ए.के.पाटील, शंकर नाईक, बी.एस.पाटील, सिद्धू अलगरथ, कडप्पा पाटील, गविश रवदी , शिवू पाटील व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
Recent Comments