Belagavi

अनिरुद्ध अकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटतर्फे रक्तदान शिबीर

Share

बेळगावात अनिरुद्ध अकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटतर्फे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

बेळगावातील कॅम्पमधील गंगाधर शानभाग प्रार्थना सभागृहात अनिरुद्ध अकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटतर्फे दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिशन सेंटर, श्री अनिरुद्ध आदेश पथक आणि श्री अनिरुद्ध समर्पण पथक यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे हॉटेल उद्योजक अजित शानभाग यांनी शिबिराचे उदघाटन करून शुभेच्छा दिल्या. या शिबिरात सुमारे ३० हुन अधिक जणांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.


शिबिरासंदर्भात माहिती देताना अनिरुद्ध उपासना केंद्राचे पदाधिकारी रुपेशसिंह खोत यांनी सांगितले की, अनिरुद्ध अकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटतर्फे आज संपूर्ण देशात ७८ ठिकाणी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात गंगाधर शानभाग प्रार्थना सभागृहात आज सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत महारक्तदान शिबीर घेण्यात येतंय. हॉटेल उद्योजक अजित शानभाग यांच्याहस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले आहे. दुपारच्या आतच २३ जणांनी रक्तदान केलं असून, सुमारे ५० दाते रक्तदान करण्याची अपेक्षा आहे. शिबीर यशस्वी होण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्राच्या सप्तसंघसेवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात बेळगावसह परिसरातील अनिरुद्ध उपासना केंद्राचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: