election

राहुल गांधी उद्या बागलकोट , विजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Share

केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या बागलकोट विजापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले कि , उद्या सकाळी 7-20 वाजता, राहुल गांधी दिल्ली विमानतळावरून रवाना होतील. सकाळी 10:00 वाजता ते हैदराबादहून हुबळीकडे प्रयाण करतील आणि सकाळी 10:50 वाजता ते हुबळीहून हेलिकॉप्टरने प्रवास करतील आणि 11:40 वाजता बागलकोटमधील कुडलसंगम मैदानात पोहोचतील. 11-50 ते 12-10 पर्यंत ते कुडलसंगम मंदिर आणि बसवण्णांच्या ऐक्य मंडपाला भेट देतील.

 

12-15 ते 1-30 या कालावधीत बसव मंटप, कुडलसंगम येथे होणाऱ्या बसव जयंती कार्यक्रमात सहभागी होणार असून, 1-40 ते 2-10 या कालावधीत कुडलसंगम येथील दासोह भवनात प्रसाद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2-15 ते 4-15 पर्यंत कुडलसंगम येथील यात्री निवास येथे विसावा घेतील. 4-25 वाजता हेलिकॉप्टरने विजापूर जाणार असून 4-50 वाजता हेलिकॉप्टरने विजापूरला पोहोचणार असून, सायंकाळी 5 ते 6-30 या वेळेत रोड शो करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ते शहरातील शिवाजी चौक ते कनकदास सर्कल असा रोड शो करणार आहेत. विजापूर शहरात ते रात्रीचा मुक्काम करणार असल्याचे एम.बी.पाटील यांनी सांगितले.

Tags: