Belagavi

जनतेचा प्रचंड पाठिंबा हे विजयासाठी वरदान : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील आमदार आणि काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुमारस्वामी लेआउट, पोलीस कॉलनी, आश्रय कॉलनी आदी ठिकाणी प्रचार करून जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.


यावेळी मतदारांना संबोधित करताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या की, “गेल्या ५ वर्षांपासून तुम्ही सर्वांनी मला घरची मुलगी म्हणून पाहिले, प्रेमाने व आपुलकीने माझे स्वागत केले, प्रत्येक विकास कामात सहभागी होऊन मला आशीर्वाद दिले. तुमचे प्रेम आणि प्रोत्साहन अमूल्य आहे.”

“येत्या काळात आणखी विकासकामे करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आवश्यक आहेत. आणखी एक निवडणूक तोंडावर आहे. तुमचा पाठिंबा सदैव काँग्रेस पक्षाला असू द्या,” अशी विनंती त्यांनी केली.
स्थानिक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Tags: