Dharwad

हुबळीच्या विद्यानिकेतन पदवीपूर्व कॉलेजचा विद्यार्थी विज्ञान शाखेत तिसरा

Share

हुबळी येथील चौगला एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन पदवीपूर्व कॉलेजचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी साईश गोणी याने विज्ञान शाखेत तिसरा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकिक मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे सचिव अनिलकुमार चौगला यांनी आनंद व्यक्त केला.

 

हुबळीतील , चौगला एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या साईश गोणी याला बारावीच्या परीक्षेत इंग्रजी- 96, संस्कृत- 100, भौतिकशास्त्र- 99, रसायनशास्त्र- 99, गणित- 100, जीवशास्त्र- 100 असे एकूण एकूण 600 पैकी 594 गुण मिळाले आहेत.
हे यश केवळ पालकांच्या पाठिंब्याने आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झाले,” असे साईश गोणी यांनी सांगितले,
मी परीक्षेला सक्षमपणे सामोरे गेलो . रँक येईल अशी अपेक्षा नव्हती. ही सर्व देवाची कृपा आहे’,
मला वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मी NEET परीक्षेची तयारी केली आहे. वडील गुरुप्रसाद हे ऑटोमोबाईल पार्ट्स सेल्समन आहेत. , आई शशिकला गृहिणी आहेत. असे त्याने सांगितले .

साईश गोणी याने विज्ञान शाखेत तिसरा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव लौकिक मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे सचिव अनिलकुमार चौगला यांनी आनंद व्यक्त केला.

 

Tags: