खानापूर तालुक्यातील गोधोळी येथील चार जणांना अज्ञात कारने धडक दिली, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
खानापूर तालुक्यातील गोधोळी येथील चौघेजण शेतात उसाला पाणी पाजून घरी परतत असताना अज्ञात कारने धडक दिल्याने त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वर शिंदे (65) व पुंडलीक रेडेकर (72) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलीकचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर गंभीर जखमी झाला असून अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमींची व मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
तत्काळ पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्याची व्यवस्था केली. हेस्कॉमच्या अधिकार्यांना रात्री शेतात तीन फेज वीज पुरवठा करून दिवसा वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचा काहीही उपयोग झालेला नाही, भाजप सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
Recent Comments