Belagavi

येणारा काळ तरुणांसाठी आव्हानात्मक, स्पर्धात्मक, संधींचा लाभ घ्या : प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली

Share

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. पण संशोधन-तंत्रज्ञान आणि आविष्कारात भारत जगात आघाडणीवर आहे. त्यामुळे येणारा काळ तरुणांसाठी आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक असेल. या संधींचा तरुणांनी लाभ घेतला पाहिजे असे आवाहन गदग येथील कर्नाटक राज्य ग्रामविकास आणि पंचायत राज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली यांनी केले.

बेळगावात हिंदवाडीतील केएलएस संस्थेच्या स्वायत्त आयएमईआर संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहून या नात्याने बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली म्हणाले की, जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असणे आव्हानात्मक आहेच, पण याकडे एक संधी म्हणूनही पाहिले पाहिजे. कारण सर्वाधिक लोकसंख्येत तरुणांची संख्या जास्त असणार आहे. विध्यार्थी, तरुणांसाठी आगामी काळ स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक असेल. या पार्श्वभूमीवर त्यांनी अभ्यास, ज्ञानाच्या कक्षा रुंदावून नवनवीन आविष्कार घडवले पाहिजेत. ज्यांना सुविधा मिळत नाहीत, त्यांना मदत केली पाहिजे. आयएमईआर ही व्यवस्थापन शास्त्राचे दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. तिचा सदुपयोग विध्यार्थ्यानी करून घ्यावा असे सांगून एमबीए उत्तीर्ण विध्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सुवर्णपदक विजेती शिवानी मुतगेकर या विद्यार्थिनीने सांगितले की, खूप मेहनत घेऊन अभ्यास केल्याने मला सुवर्णपदक मिळवता आले. सर्वच विध्यार्थ्यानी असे यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे. माझ्या यशात आई सुवर्ण, वडील चंद्रकांत मुतगेकर आणि बहिणीचे योगदान असल्याचे तिने सांगितले. अन्य सुवर्णपदक विजेत्या विध्यार्थ्यानी आयएमईआर संस्थेत व्यवस्थापन शास्त्राचे उत्तम धडे, ज्ञान मिळाले. शिक्षकांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे आम्ही हे यश गाठू शकलो असे कृतज्ञ भाव व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.

पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी केएलएस संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी होते. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे माजी संचालक एस. सदागोपन यांचे बीजभाषण झाले. शिवानी मुतगेकर आणि पियुष मजली या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्य पदक विजेत्या विध्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. सर्व 94 एमबीए उत्तीर्ण विध्यार्थ्यांना सांकेतिक पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

समारंभाला केएलएस संस्थेचे चेअरमन प्रदीप सावकार, सचिव विवेक कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी, आयएमईआर संचालन समितीचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक, संचालक प्रा. आरिफ शेख आदी उपस्थित होते.

Tags: