2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रात्री उशिरा सहा मतदारसंघातील आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. उद्यापासून राज्यभरात जाहीर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत उर्वरित 5 मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून उमेदवारांची यादी काल रात्री फायनल करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंगळवारी चौथ्या यादीतील 8 मतदारसंघ बाकी असताना 7 उमेदवारांची तिकिटे जाहीर करण्यात आली होती. शिग्गावमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उमेदवार बुधवारी रात्री बदलला आहे.
अंतिम यादीतील उमेदवार पुढीलप्रमाणे :
शिडलघट्टा : बी. व्ही. राजीव गौडा
सर सीव्ही रमण नगर : एस. आनंदकुमार
रायचूर शहर : मोहम्मद शालम
अरकलगुडू : एच. पी. श्रीधर गौडा
मंगळूर उत्तर : इनायत अली
मंगळूर उत्तर मतदारसंघात दोन नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा होती. मोहिद्दीन बावा आणि इनायत अली हे दोघेही तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांच्यातील लढतीमुळे या मतदारसंघाचे तिकीट राखीव ठेवले होते. शेवटी इनायत अली यांना तिकीट मिळाले. अरकालगुडमध्ये एम. टी. कृष्ण गौडा आणि श्रीधर गौडा यांच्यात काट्याची टक्कर होती. त्यात अखेर श्रीधर गौडा यांनी बाजी मारली.
सर्व 224 मतदारसंघांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
भाजपने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. चार टप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या भाजपने सर्व 224 मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, उद्यापासून राज्यभरात जाहीर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.


Recent Comments