Belagavi

उत्तरमधून अशोक गोवेकर अपक्ष म्हणून रिंगणात

Share

बेळगाव उत्तरमधून सामाजिक कार्यकर्ते अशोक गोवेकर यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.

गेली अनेक वर्षे बेळगावात समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अशोक गोवेकर यांनी जनतेच्या आग्रहास्तव बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी आज महानगर पालिकेतील निवडणूक अधिकारी कार्यालयात समर्थकांसह जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक गोवेकर म्हणाले की, गेली अनेक वर्षे मी समाजसेवा करत आहे. निरपेक्षपणे लोकांची सेवा करत आहे. त्यामुळे अनेकांनी मला विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. म्हणून मी आज बेळगाव उत्तरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. मतदारांनी मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी महापौर ऍड. एन. बी. निर्वाणी, प्रकाश कर्लिंगन्नावर, विरगौडा, एन. एन. पाटील आदी उपस्थित होते.

Tags: