Belagavi

रामदुर्गमध्ये 1कोटी 54 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त

Share

रामदुर्गमध्ये एका कारमधून नेण्यात येत असलेली 1कोटी 54 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम पोलिसांनी जप्त केली.


एका कारमधून बेहिशेबी रक्कम नेण्यात येत असल्याची पक्की खबर रामदुर्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सदर कार अडवून झडती घेण्यात आली.

 

यावेळी कारमध्ये 1कोटी 54 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. आयकर खात्याला याची माहिती देण्यात आली असून रक्कम त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आयकर अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Tags: