यमकनमर्डी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बसवन आजा हुंद्री यांनी यमकनमर्डी निवडणूक अधिकारी बलराम चौहान आणि ईओ विलासराज यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
भाजपचे नेते आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांच्यासह महांतेश कवटागीमठ, जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, काळगौडा पाटील, रवी हांजी यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता हुक्केरी प्रशासन इमारतीच्या सभा भवनात उमेदवारी अर्ज सादर केले.

नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, यत्नाळ म्हणाले कि , राज्यात भारतीय जनता पक्षाला 130 जागा जिंकून राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. यमकनमर्डी मतदारसंघात बसवराज हुंद्री यांचा विजय निश्चित आहे, सनातन धर्मानुसार हुंद्री यांनी धार्मिक विधी करून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. विरोधी पक्षाने काहीही केले तरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयाचा उमेदवार असतो.
यमकनमर्डी मतदारसंघाचे उमेदवार बसवराज हुंद्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या असल्याने लोक मला मतदान करून आशीर्वाद देतील .
यावेळी रवींद्र हंजी, काळागौडा पाटील, शिवानंद मसगुप्पी, विनोद पाटील, डॉ.गिरीराज शिरगे, नागराज पाटील, वैभव दुंगडी, प्रज्वल मुतालिक, धनकुमार पाटील, आदी शेकडो कार्यकर्त्यांनी मिरवणुकीतून येऊन उमेदवारी अर्ज सादर केले.
नंतर बसवराज पाटील , यत्नाळ यांची यमकनमर्डी गावात भव्य मिरवणुक काढली .


Recent Comments