बेळगावातील वस्त्रप्रावरणांच्या प्रसिद्ध मान्यवर एथनिक वेअर शोरूमला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशंसा व्यक्त केली.
पोरवाल कुटुंबियांच्या बेळगाव खडेबाजारातील वस्त्रप्रावरणांच्या प्रसिद्ध मान्यवर एथनिक वेअर शोरूमला वेदांत फॅशन्स लि.
कोलकाता आणि मान्यवर मोहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज भेट देऊन पाहणी केली. रिटेल बिझनेस डेव्हलपमेंट हेड जयदीप दास आणि कर्नाटक रिटेल बिझनेस डेव्हलपमेंट हेड कमल मेहता यांनी पोरवाल कुटुंबीय संचालित मान्यवर एथनिक वेअर शोरूममधील वस्त्रप्रावरणांची मांडणी, संरचना पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना कर्नाटक रिटेल बिझनेस डेव्हलपमेंट हेड कमल मेहता म्हणाले की, पोरवाल कुटुंबीयांची बेळगावात क्लब रोडवर, टिळकवाडी आणि बेळगाव खडेबाजारात अशी एकूण तीन मान्यवर शोरूम्स आहेत. ग्राहकांना तत्पर, हसतमुख विनम्र सेवा देऊन पोरवाल कुटुंबीयांनी व्यवसायात यश मिळवले आहे. त्याबद्दल समाधान वाटते असे सांगितले.

यावेळी सुरेश पोरवाल, विजय पोरवाल, हितेश पोरवाल, श्रेयश पोरवाल, रोहन पोरवाल उपस्थित होते.


Recent Comments