Belagavi

सौंदत्तीत अधिकाऱ्यांचा छापा : 42.92 लाखांची शिलाई मशिन्स, टिफिन बॉक्स जप्त

Share

सौंदत्ती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या शिलाई मशीन आणि टिपिन बॉक्सच्या गोदामावर छापा टाकून सुमारे 42.92 लाखांचे साहित्य जप्त केले आहे.
सौंदत्ती येथील अपक्ष उमेदवार सौरव चोप्रा यांच्या मालकीचे हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


मतदारांना वाटपासाठी शिलाई मशिन्स आणि टिफिन बॉक्स साठवून ठेवल्याची माहिती मिळताच सौंदत्ती प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून 23,84,272 किमतीच्या 1012 शिलाई मशिन्स आणि 4,56,000 किमतीचे 1200 शिलाई मशीन टेबल आणि शिलाई मशीन लोखंडी जप्त करण्यात आली.

स्टँड 1060 किमतीचे 11,27,840 आणि 2160 टिफिन बॉक्स 3,24,000 असे एकूण 42,92,112 किमतीचे साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या प्रकरणी संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले.

Tags: