खानापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार , डॉ . अंजली निंबाळकर यांनी , चौराशी मंदिरात पूजा करून , मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयात जाऊन , आपला उमेदवारी अर्ज सादर केला .

व्हॉईसओव्हर : खानापूर तालुक्यात निवडणुकी ची रणधुमाळी जोरात सुरू आहे, खानापुरची शक्तीदेवी चौराशी मंदिर,गणपती मंदिरात पूजा केल्यानंतर मिरवणुकीने बसवेश्वर सर्कल , टिपू सुलतान चौक, मार्गे जाऊन , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयात जाऊन काँग्रेसच्या उमेदवार , डॉ . अंजली निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला .
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून पुन्हा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी राज्य अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज अहमद पटेल, शंकर गौडा पाटील, आर.डी. हांजी, मल्लिकार्जुन वाली, आर.एस.पाटील, अमित पाटील, महांतेश वाली, महांतेश कल्याणी, शफी काझी, अनिल सुतार, अल्ताफ बसरीकट्टी, संतोष हांजी, तमन्ना कोलकार, अश्विनीहोसुरी. सावित्री मादारा, काशिम हट्टीहोळी राजश्री चौहान, श्वेता शिवटणकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments