हुक्केरी शहरातील शिवलिंगेश्वर विरक्त मठ व हावेरी मठ यांच्या वतीने बसव जयंती उत्सव व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिव बसव महास्वामीजीनी दिली .

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 19 ते 23 एप्रिलपासून शिवलिंगेश्वर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी 6 वाजता बसव दर्शन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून, हुक्केरी शहरातील सर्व भाविकांनी यावे व प्रवचन ऐकावे व प्रसाद ग्रहण करावा.
रविवारी देशातील विविध मठाधिपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या समारोप समारंभात जमीन देणाऱ्यांचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार असल्याचे श्री मठाचे निकटवर्तीय सेवानिवृत्त प्राध्यापक सी जी पाटील यांनी सांगितले.


Recent Comments