हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री ए.बी.पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह त्यांनी हुक्केरी प्रशासनाच्या इमारतीत जाऊन निवडणूक अधिकारी तथा बेळगाव जिल्हा पंचायत उपसचिव विजयकुमार अळुरे व तहसीलदार एस.बी.इंगळे यांच्याकडे त्यांनी दोन नामनिर्देशनपत्रे सादर केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ए.बी.पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष राज्यात 150 जागा जिंकून स्थिर सरकार स्थापन करेल. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी आणि शशिकांत नाईक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला बळ मिळाले असून, हुक्केरी मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते बूथ स्तरावर प्रचार करून मला आशीर्वाद देतील.
यावेळी हुक्केरी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी , संकेश्वर ब्लॉक अध्यक्ष संतोष मुडशी, डी.टी.पाटील, भीमाप्पा रामगोनट्टी, ए.बी.पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments