artist

इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Share

मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेनं खास लूकमध्ये हजेरी लावली. इफ्तार पार्टीतील पूजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

इफ्तार पार्टीसाठी पूजानं ब्लॅक ड्रेस, व्हाईट स्टोनची ज्वेलरी, असा लूक केला होता. पूजा हेगडेच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. इफ्तार पार्टीतील पूजाच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पूजाला ट्रोल केलं आहे.

इफ्तार पार्टीतील पूजाच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘प्रत्येकाच्या धर्माचा आदर करा असा ड्रेस घालून यायाला ही, डान्स पार्टी नाही, इफ्तारी पार्टी आहे.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘कदाचित पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला आली असेल. तिने इफ्तार पार्टीत चुकीचा ड्रेस घातला आहे.’
दरवर्षीप्रमाणेच अभिनेता सलमान खाननं यावर्षी देखील बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती लावली. सलमानसह ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.

पूजा हेगडेचे आगामी चित्रपट
पूजा ही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पूजाच्या दुवदा जगन्नाथम, साक्षीम, बीस्ट, मुगामुदी या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं हृतिक रोशनच्या मोहनजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिनं हाऊसफुल-4 मध्ये प्रमुख भूमिका साकारली. काही महिन्यांपूर्वी तिचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता

Tags: